मेट्रोची कारशेड आरेमध्येच होणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना दणका

गुरूवार, 21 जुलै 2022 (13:51 IST)
मेट्रोचे कारशेड आरे जंगलाच्या जागेत बनवण्यारवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. मुंबईत मेट्रो तीनची कारशेड आरे कॉलनीतच होणार आहे. या कारशेडसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 
 
सध्या आरे कारशेड हा विषय कोर्टात प्रलंबित असून ठाकरे सरकारने आरे कॉलनीला वन क्षेत्र जाहीर केले आहे. आता शिंदे सरकार ठाकरे सरकारचे मेट्रो कारशेड संदर्भातले निवडक निर्णय बदलण्याची तयारी करत असून आता या प्रश्नात निर्माण झालेली गुंतागुंत सोडवून आरेतील कारशेडचे काम लवकर सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत.  
 
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मेट्रो कारशेड आरेमध्येच होणार हे निश्चित झाले होते. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आरेतील कारशेडला विरोध होता.
 
आरे कॉलनीत 804 एकर परिसर आहे. यापैकी मर्यादीत भूभाग मेट्रो कारशेडसाठी वापरला जाणार आहे. उर्वरित आरे कॉलनी सुरक्षित राहणार आहे. कारशेडचे काम ठाकरे सरकारच्या काळात दीर्घकाळ स्थगित झाले होते त्यामुळे राज्याला मोठा आर्थिक फटका तर बसलाच होता सोबतच नागरिकांना मिळणारी सुविधा अजून देखील प्रलंबित आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरेमध्येच मेट्रो तीनची कारशेड झाली पाहिजे, अशा सूचना महाधिवक्त्यांना दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती