या गोडाऊनमध्ये कच्चा माल, तेलाचे जूने ड्रम होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकली. साधारण १५ हजार स्क्वेअर फीट परिसरात आग पसरली. आग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरले. या परिसरात दाटीवाटीने गोदामं असल्याने आग वेगाने पसरली आणि आगीत गोदामं जळून खाक झाली. लाखोंचे नुकसान झाले आहे.