राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी ढग, पावसामुळे थंडी वाढणार

गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (11:53 IST)
आज महाराष्ट्रातील हवामानात थोडा बदल झाला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर तापमानातही घट नोंदवली जात आहे. हवामान खात्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यात होत असून त्यामुळे पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत पाऊस आणि बर्फाळ वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण होऊ शकते.
 
त्याचवेळी राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीपासून दिलासा मिळालेला नाही. आता पावसामुळे थंडी पडू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या आठवड्यात या ठिकाणी थंडी आणि धुक्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. त्यानंतर तापमानातही वाढ होऊन उष्णतेची चाहूल लागण्यास सुरुवात होईल. जाणून घेऊया राज्यातील मोठ्या शहरांमध्ये आज हवामान कसे असेल?
 
मुंबई
आज मुंबईत कमाल तापमान 28 तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 166 नोंदवला गेला.
 
पुणे
पुण्यात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही धुक्यासह ढगाळ वातावरण राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 117 वर नोंदवला गेला.
 
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. त्याच वेळी, वायु गुणवत्ता निर्देशांक 114 आहे, जो मध्यम श्रेणीमध्ये येतो.
 
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल. हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीतील 118 आहे.
 
औरंगाबाद
आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. मध्यम श्रेणीतील हवेचा दर्जा निर्देशांक 125 आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती