डिपफेक व्हिडीओ पाहून केली गुंतवणूक, मुंबईतील डॉक्टरची सात लाखांना फसवणूक

शनिवार, 22 जून 2024 (11:05 IST)
मुंबई मध्ये एक घटना समोर आली आहे. पश्चिम मुंबई मधील एका 54 वर्षीय डॉक्टरची फसवणूक करण्यात आली आहे. हे एक आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहे आणि मे मध्ये इंस्टाग्राम फीड वर स्क्रॉल करतांना त्यांनी एक डिपफेक व्हिडीओ पाहिला. ज्यामध्ये मुकेश अंबानींना राजीव शर्मा ट्रेड ग्रुप नावाच्या एका ट्रेडिंग एकेडमीचा प्रचार करतांना दिसत होते. 
 
तसेच या डिपफेक व्हिडीओ मध्ये अंबानी ट्रेडिंग एकेडमीच्या यशाबद्दल चर्चा करीत होते. तसेच लोकांना त्यांच्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या गंतुवणुकीबद्दल अधिक रिटर्न मिळण्यासाठी बीसीएफ एकेडमी मध्ये सहभागी होण्यासाठी सांगत होते. डॉक्टरांनी हा व्हिडीओ पंधरा एप्रिलला पहिला होता. 
 
एफआईआर मध्ये सांगितले गेले की, डिपफेक व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेटवर त्यांनी शोध घेतला. या दरम्यानत्यांना माहित झाले की, याचे ऑफिस लंडन आणि कुर्ला मध्ये आहे. व त्यांना विश्वास बसला. व ऑनलाईन संपर्क करून मे आणि जून च्या दरम्यान त्यांनी 7.1 लाखाची गुंतवणूक केली. मग त्यांना काही वेळानंतर समजले की त्यांना 30 लाखांचा लाभ झाला आहे. पण जेव्हा त्यांनी अकाउंट मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर निघाले नाही. व त्यांनी पोलिसांमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती