International Women's Day: मुंबई महिला पोलिसांना खास गिफ्ट, मंगळवारपासून होणार ८ तासांची शिफ्ट

मंगळवार, 8 मार्च 2022 (09:51 IST)
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई पोलिस दलातील  महिला कर्मचाऱ्यांना मंगळवारपासून आठ तासांची शिफ्ट मिळणार आहे. पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. महिला कर्मचार्‍यांना घर आणि कामामध्ये चांगले संतुलन राखण्यास मदत करण्याच्या उद्देशाने हे निर्देश पुढील आदेशापर्यंत मुंबईत  लागू राहतील, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.  
 
पांडे यांनीच राज्याचे प्रभारी डीजीपी या नात्याने या वर्षी  जानेवारीमध्ये आठ तास ड्युटी उपक्रम सुरू केला. "सीपीच्या आदेशानुसार, महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायात त्यांना सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि  रात्री 10 ते सकाळी 8 अशा तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल. दुसऱ्या पर्यायामध्ये, शिफ्टच्या वेळा सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या आहेत.  
 
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ड्युटी तासांबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही पर्यायांनुसार त्यांना ड्युटी  सोपवावी, असे आदेशात म्हटले आहे. आदेशात म्हटले आहे की  उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास, पोलिस अधिकारी डीसीपी (ऑपरेशन्स) यांच्याकडे संपर्क साधू शकतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती