आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य; छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गुरूवार, 16 जून 2022 (08:45 IST)
मुंबई: ओबीसी आरक्षणावरुन  राज्यात गोंधळ सुरु आहे. भाजप नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ  यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांना आज पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आडनावावरुन ओबीसींचा डेटा गोळा करणं अयोग्य असल्याचे म्हटलं आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 
मंत्री भुजबळ म्हणाले, ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पत्रात केली आहे. ओबीसींचे नुकसान होऊ देऊ नका असे आवाहनही मुख्यमंत्र्यांना केले. पुढे बोलताना ते म्हणाले, चुकीच्या पध्दतीने माहिती गोळा केली जात आहे. झोपडपट्टीत उच्चवर्णीय राहत नाहीत. मोठ्या शहरात ५ टक्के ओबीसी राहतात असे दाखवले जात आहे. यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे असा आरोप ही त्यांनी केला. याची कसून चौकशी व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती