एमआरआय मशिनपर्यंत कॅमेरे कसे जातात? रुग्णांच्या सुरक्षेचं काय?-माजी महापौर किशोरी पेडणेकर

सोमवार, 9 मे 2022 (15:01 IST)
खासदार नवनीत राणा  यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर , मनिषा कायंदे  आणि शिवसेना  नेत्यांनी सोमवारील लीलावती रुग्णालयात जात तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नवनीत राणांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. नवनीत राणा स्पाँडिलायसिसचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांचा MRI काढण्यात आला. यावेळी MRI काढत असतानाचे त्यांचे काही फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरून किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाला धारेवर धरलं आहे. पेडणेकर यांनी आक्षेप घेतला आहे.
 
खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत होत्या. यावेळी त्यांचे रुग्णालयातले काही फोटो व्हायरल होत होते. त्यांचा MRI मशीनमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवर आक्षेप घेत आता शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालय प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एमआयआर कक्षात मोबाईल नेणे, ही तुम्हाला गंभीर बाब वाटत नाही का? तुम्हाला कोणी जाब विचारण्यापूर्वी तुम्ही या सगळ्याची विभागीय चौकशी का केली नाही?. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही व्हीआयपी व्यक्ती असतो, रुग्णालयाचे नियम सगळ्यांना सारखे असतात.
 
रुग्णालयांचा कारभार हा चॅरिटी कमिशनच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे तुमचे रुग्णालय खासगी असले तरी त्याठिकाणी सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. आम्ही असले प्रकार रुग्णालयात खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठणकावले.
 
दरम्यान नवनीत राणांचा MRI नक्की झाला की नाही? झाला असेल तर रुग्णालय प्रशासनाने त्याला अहवाल सादर करावा. MRI रुममध्ये रुग्णासोबत एकाच व्यक्तीला परवानगी असताना राणांसोबत चार लोक कसे गेले. सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ मला द्या, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती