वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३० मार्चला सुनावणी

शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:58 IST)
मुंबई पोलीस दलातील दुसऱ्यांदा निलंबित केलेले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता ३० मार्चला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) न्यायालयात  याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान एटीएसने या आपले उत्तर न्यायालयात दाखल केले आहे. 
कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे यांचे वकील आरती कालेकर म्हणाल्या, "कोठडीचा मुद्दा नाही. आम्ही आमच्या क्लायंटशी कोणते मुद्दे आहेत याबद्दल बोलू. सचिन वाझे यांच्या बहिणीने सांगितले आहे की, वाझे यांचे कुटुंबीय राहत असलेल्या ठिकाणी माध्यमांनी त्रास देऊ नये म्हणून देखील याचिका दाखल देखील आहे. वाझे यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती