मुबंईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या डब्याला सोमवारी सकाळी आग लागली. या घटनेत एकही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. ठाणे जिल्ह्य़ाजवळ ही आग रेल्वेच्या एका चाकात ब्रेक बाइंडिंगमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली.