महाराष्ट्रातील भिवंडीच्या फर्निचर कारखान्यात भीषण अग्निकांड,कोणतीही जीवित हानी नाही

शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (10:37 IST)
ठाण्यातील भिवंडीच्या कशेळी परिसरातील महालक्ष्मी फर्निचरच्या गोदामाला शुक्रवारी भीषण आग लागली . या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर त्याने भीषण रूप धारण केले. आगीचे कारण समजू शकले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेचे 4 ते 5 अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
 
मुंबईतील भिवंडी परिसरात भीषण अग्निकांडात तब्बल 50 हुन अधिक गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास लागली  

या अग्निकांडात 5 कारखाने जळून खाक झाले आहे.ही आग भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्प्लेक्स मधील एका फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यात लागली आहे. 
 
आग शॉट सर्किट मुळे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारखान्यात पत्राचे शेड असल्यामुळे ही आग झपाट्याने सर्वत्र पसरली.आणि या अग्निकांडामुळे कोट्यावधी  रुपयांचे साहित्याचा कच्चा माल जळून खाक झाला आहे.आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात त्यांना यश आले.सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती