दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि लसीकरणाला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यात येतो. त्यानंतर आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे
भविष्यात जर लहान मुलांसाठीची लस उपलब्ध झाली तर या वयोगटातील लोकांसाठी रेल्वे प्रवासासाठीची मुभा केवळ पुढचे 60 दिवसांसाठी असेल असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे लोकल प्रवासासाठी केवळ रेल्वेच्या तिकीट घरांमधूनच ही टिकीटं मिळणार आहेत. जेटीबीस, एटीएमव्ही आणि यूटीएसच्या मार्फत ही तिकीटं मिळणार नाहीत.