मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ७ कोटींचे ड्रग्ज जप्त

सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:33 IST)
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल, रविवारी रात्री ७ कोटींचे ड्रग्ज जप्त केले असून या विदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा विदेशी नागरिक चक्क पोटातून ७ कोटी ड्रग्जची तस्करी करत होता.मुंबई विमानतळावरून एक विदेश नागरिक मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊ जात आहे, अशी माहिती सुत्रांकडून एनसीबीला मिळाली होती. ही माहिती मिळताच एनसीबीच्या टीमने विमानतळावर पाळत ठेवली. यादरम्यान संशयाच्या आधारे एनसीबीने त्याची चौकशी केली.त्यावेळेस एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकत नव्हता. मग तपासदरम्यान विदेशी नागरिकाने ड्रग्ज गिळले आहेत,असे आढळून आले.
 
एनसीबीच्या सुत्रानुसार या विदेशी नागरिक सुमारे ७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात भरून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळेस मुंबईतील विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. विमानतळावर बॉडी स्कॅनमध्ये त्याच्या पोटात संशयास्पद कॅप्सूल आढळून आले. मग त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती