विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एका चाडियन नागरिकाला अटक केली आहे. माहितीच्या आधारे, डीआरआयने एका पुरुष प्रवाशाला थांबवले. तो चाडियन नागरिक आहे आणि शुक्रवार 16 मे 2025 रोजी आदिस अबाबाहून आला होता.
हा व्यक्ती चपलांच्या टाचांमध्ये हुशारीने लपवून परदेशी मूळचे सोन्याचे बार आणत होता. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी ते जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन ४०१५ ग्रॅम होते, ज्याची किंमत सुमारे 3.86 कोटी रुपये आहे.
त्याच्या जबाबात, प्रवाशाने कस्टम तपासणी टाळण्यासाठी सोने लपवल्याची कबुली दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीआरआयने तस्करी केलेले सोने जप्त केले आणि सीमाशुल्क कायदा, 1962च्या तरतुदींनुसार त्या व्यक्तीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
चाड हा मध्य आफ्रिकेत स्थित एक भूपरिवेष्ठित देश आहे. चाडचा उच्चार त्शाद असाही होतो. चाडच्या पूर्वेस सुदान, पश्चिमेस कॅमेरून, उत्तरेस नायजेरिया, नायजर, लिबिया आणि दक्षिणेस मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आहे.