बनावट लसीकरण प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी पोलिसांना शरण

मंगळवार, 29 जून 2021 (16:14 IST)
मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी कांदिवली पोलिसांसमोर शरण आला आहे. या अगोदर त्याने अटकेच्या भीतीने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती.
 
गेल्या आठवडय़ात हा बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला होता. आतापर्यंत फरारी असलेल्या त्रिपाठी याने अटकेच्या भीतीने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अ‍ॅड्. आदिल खत्रीच्या मार्फत त्रिपाठीने हा अर्ज केला होता. आपण पोलिसांना तपासात सहकार्य केल्याचे आणि १५ जूनला जबाबही नोंदवल्याचा दावा त्रिपाठी याने अर्जात केला होता.
 
कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेजमधील जवळपास १०० नागरिकांना बनावट लस दिल्याचे समोर आल्यानंतर नानावटी, लाइफ सायन्स आणि गोरगाव नेस्को रुग्णालयाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती