अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला.या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेली. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरून त्यांची विचारपूस केली. तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्याने काही वेळ पिंपळे देखील गहिवरल्या.आपण लवकर बऱ्या व्हा आणि इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दोन दिवसापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत ठाणे मनपा अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवरुन ठाणे कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपुस केली आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या मोबाईलवरून हा फोन लावण्यात आला होता.आपण लवकर बऱ्या व्हा व इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.त्या माथेफिरुला कडक शासन व्हावे ही इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवताच त्याची काळजी तुम्ही करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.दरम्यान, यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची सानुग्रह निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी त्वरित मान्य केली.दरम्यान, कल्पिता पिंपळे प्रकरणात सरकारचे मोठं पाऊल उचलले असून खटला लढवण्याकरता विशेष वरीष्ठ वरीलांची नेमणूक करण्यात येणार आहे.