अमेरिकन सैन्याने अफगाण सोडतातच,तालिबानने विमानतळ काबीज केले

मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (12:16 IST)
अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडल्यानंतर तालिबानने काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पूर्ण ताबा घेतला. गेल्या काही दिवसांपासून देश सोडून जाणाऱ्या लोकांची गर्दी असलेले काबूल विमानतळ अखेर पूर्णपणे शांत झाले आहे.सोमवारी रात्री अमेरिकेचे शेवटचे विमानने अफगाणिस्तानातून उड्डाण केले.यासह, त्याची 20 वर्षांची मोहीम संपली आणि तालिबानने काबूल विमानतळाचा ताबा घेतला. 
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले - आज आम्ही काबूलमधील आमची राजनैतिक उपस्थिती रद्द केली आहे आणि आमचे कामकाज कतारची राजधानी दोहा येथे हस्तांतरित केले आहे.आम्ही दोहा,कतार मधील आमच्या पोस्टचा वापर अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी करू.अमेरिकेची लष्करी उड्डाणे थांबली आहेत आणि आमचे सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहे.
 
मंगळवारी सकाळपूर्वी, सशस्त्र तालिबान लढाऊ  हँगरद्वारे विमानतळावर दाखल झाले. तालिबानचे प्रवक्ते यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आज रात्री 12 वाजता अफगाणिस्तानच्या वेळेनुसार उर्वरित अमेरिकन सैनिकांनीही काबूल सोडले आणि आपला देश पूर्णपणे मुक्त झाला आहे." एएफपीच्या बातमीदारांनी सांगितले की त्यांनी अनेक चेकपोस्टवर आनंद व्यक्त करण्यासाठी केलेल्या गोळीबाराचे आवाज ऐकले. काही व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केले जात आहेत ज्यात तालिबानला हवेत गोळीबार करताना दिसून येत आहेत.अमेरिकेच्या सेन्याने जरी काबुल सोडले आहे तरी ही देशासाठी अमेरिकेची मदत अजूनही चालू असणार आहे. अजूनही अफगाणिस्तानात मोठ्या संख्येत लोक आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती