लसीकरणाच्या ठिकाणी जाहिरातबाजी करू नका

शुक्रवार, 4 जून 2021 (07:53 IST)
मुंबई महापालिकेच्या लोकप्रतिनिधींना आयुक्तांनी तंबी दिली आहे. महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांनी जाहिरातबाजी करू नये, अशी तंबीच आयुक्तांनी दिली आहे. लोकप्रतिनिधी पक्षीय राजकारण आणि श्रेयवाद यासाठी जाहिरातबाजी करीत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
जाहिरातबाजीचे होर्डिंग, बॅनर्स हटविण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी लसीकरण केंद्र त्यांच्या राजकीय पक्षाच्या, नेत्यांच्या व स्वतःच्या पुढाकाराने सुरू झाल्याचे दाखविण्यासाठी व त्याचे श्रेय घेण्यासाठी लसीकरण केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात होर्डिंग, बॅनर्स लावली आहेत. लसीकरण केंद्रावर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लोकं लस घेण्यासाठी येत आहेत. याचीच संधी साधण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळी करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती