वधूपिता आणि माता तिघांचे स्वागत करतात. सगळेजण दिवाणखान्यात बसतात.
काही क्षणांनी ती कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन येते. अहा! काय तिचे सौंदर्य. देवाने ज्या हातांनी माधुरी, राणी मुखर्जी आणि कतरीनाला बनवले त्याच हातांनी मध्ये ब्रेक न घेता जणू हिला बनवलं आहे.
आता ती संपूर्ण पाठमोरी होते. कारण वधूपिता आणि मामा समोर बसले आहेत.
तो घोगऱ्या आवाजात वडिलांच्या कानात कुजबुजतो. होकार देऊन टाकू. तुम्ही कोणतीही अट घालू नका. आईला पण सांगा.
त्याच क्षणी आतून आवाज येतो, “आले ग मम्मी तू गेलीस का पोहे घेऊन?"
आणि नियोजित वधू लाजत लाजत बाहेर येते...