मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले की, या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी महिलांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पण, काही विरोधी पक्ष ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न करत असून न्यायालयात जाऊन राजकारण करत आहे. तसेच निवडणूक जिंकल्यानंतर ते बंद करण्याविषयी बोलत आहे, हे वाईट राजकारण आहे.”
महिलांप्रती सरकारची बांधिलकी दाखवत फडणवीस म्हणाले की, अलीकडेच एका महिलेने त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. “त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. माझे कार्यालय महिलांसाठी नेहमीच खुले असते. त्यांच्या समस्यांची दखल घेतली जाईल.” विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांच्या सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत, पण त्यावर आता चर्चा करायची नाही.
अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत फडणवीस म्हणाले की, विदर्भात शहा यांचा दौरा सुरू असून जनतेशी संवाद साधला जात आहे. “1 ऑक्टोबरनंतर राज्यात आणखी भेटी दिल्या जातील,” असे फडणवीस म्हणाले.