लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली

रविवार, 4 जुलै 2021 (11:15 IST)
मुंबई :राज्यात महिला काही दिवस लसींचा तुटवडा असल्याने बरेचशे लसीकरण केंद्र बंद होते.परंतु शनिवारी लसीकरण केंद्र सुरु झाल्यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी जमा झाली.
 
लसींचा तुटवडा असल्याने दोन ते तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातले लसीकरण केंद्र बंद होते.परंतु शुक्रवारी लस मिळाल्यावर ठाण्याच्या काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.लसी उपलब्ध असल्याचे वृत्त समजतातच लोकांची गर्दी या लसीकरण केंद्रावर होऊ लागली आणि लोकांनी लांब रांगा लावल्या.काही केंद्रावर लसी कमी आल्याने नागरिकांचा रोष वाढला आणि सर्वत्र गोंधळ झाल्याचे वृत्त समजले.
 
काही ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लसीकरण सुरु होते.शिवाय नगर च्या लांब रांगेत लागून सुद्धा नागरिकांना लस मिळाली नाही.याचे कारण एका शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईन नोंदणी केली.त्यामुळे नागरिकांचा रोष झाला आणि गोंधळ झाला त्यामुळे पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले त्यासाठी काही काळ हे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती