दिवसागणिक वाढणार्या रुग्ण संख्येच्या कालावधीत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) वडाळा, धारावी, कुर्ला, शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी 16 मार्चपूर्वी घेतलेल्या नमुन्यांत कोरोना विषाणू आढळला नाही. मात्र, 11 ते 22 मे दरम्यानच्या नमुन्यांत कोरोना विषाणू आढळला. कोरोना बाधितांच्या मलातून हा विषाणू सांडपाणी वाहिनीत जातो, असा संशय होता. आयसीएमआरनेही सांडपाणी वाहिन्यांमध्ये कोरोना विषाणू जिवंत राहत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.