राज्यातील नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी शाळेत कोरोनाचा स्फोट झाल्याची बातमी आहे. येथे इयत्ता 8वी ते 12वीच्या 16 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेत 500 हून अधिक मुले शिकतात. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करायची आहे. या शाळेत परदेशातून आलेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा शिकतो. त्या मुलाची कोरोना चाचणी करण्यात आली .त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्या मुळे शाळेतील अन्य विद्यार्थ्यांची चाचणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले .
ओमिक्रॉनच्या 8 नवीन रुग्णांपैकी 6 पुण्यात आणि प्रत्येकी एक मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत आढळून आले आहेत. अहवालानुसार राज्यात ओमिक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 1 मुंबई आणि 1 कल्याण डोंबिवलीचा आहे.