प्रमोद मौर्य हा सह्याद्री नगर, मनवेल पाडा, विरार पूर्व येथे खाजगी कोचिंग क्लास चालवतो. यामध्ये सातवीत शिकणाऱ्या 13वर्षीय मुलीचा गेल्या आठवड्यात शिक्षकाने लैंगिक छळ केला, त्यामुळे भीतीपोटी ती दोन दिवस वर्गात गेली नाही. कोचिंग क्लासला न गेल्याने मुलीच्या पालकांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तसेच यानंतर परिसरातील पालक व संतप्त लोकांनी वर्गात जाऊन शिक्षक प्रमोद मौर्य याला बेदम मारहाण केली.
तसेच याप्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, लोकांनी आरोपीला आमच्या ताब्यात दिले आहे. त्याने मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.