भिवंडी शहरात आजमी नगर,टिपू सुलतान चौक परिसरात एक मजली इमारत कोसळली,या अपघातात सात जण जखमी झाले तर एक जणाचा मृत्यू झाला.या ठिकाणी बाजारहाट भरत असल्याचे सांगितले जात आहे.ही इमारत खाली बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याची माहिती मिळाली आहे.