बदलापुरात गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये 4 आणि 5 वर्षाच्या मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहाच्या कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यावर आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून नेताना आरोपीने पोलिसांची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रत्युत्तर देत त्याचे एन्काउंटर केले. तसेच या प्रकरणी आरोपी, शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापनातील दोन सदस्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, पॉस्को कायद्यातील तरतुदींनुसार, या खटल्याच्यावेळी महिला वकिलाला हजर राहावे लागणार.तसेच खटल्यातील विशेष सरकारी वकिलाला मदत करण्यासाठी एका महिला फिर्यादीची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 20 जानेवरी रोजी होणार आहे.