पॅरामेडिकलविषयक प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:21 IST)
कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्य व वैद्यकीय सेवा क्षेत्रात विशेषत: पॅरामेडिकल व हेल्थकेअरविषयक आवश्यक कुशल मनुष्यबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु केली आहे.त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास स्वारस्य असलेल्यांनी तातडीने संपर्क साधावा,असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.
 
या योजनेत 18 ते 45 वर्ष वयोगटातील युवा-युवतींना जिल्ह्यातील प्रसिद्ध शासकीय व नामांकित खासगी रुग्णालयामधील क्षेत्रातील निवडक अभ्यासक्रमामध्ये विनाशुल्क प्रशिक्षण देवून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे.प्रवेश घेण्याकरिता इच्छुक असणाऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfXlE-35EmeZdNCQvmuCLgcc3Qqn89ULU7IY6YSfakEBJHrXA/viewform
 
या लिंकवर त्वरित आपली नोंदणी करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहिल,असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,मुंबई उपनगर, शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती