सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:16 IST)
भाजप नेते किरिट सोमय्या यांनी  राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होती. याप्रकरणी 72 तासात किरिटी सोमय्या यांनी माफी मागवी असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. पण 72 तास उलटल्यानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अनिल परब यांनी सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
 
अनिल परब यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे. 'किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी व मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांत माफी मागण्याचे सूचित केलं होतं. परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी  किरीट सोमय्या यांच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती