समाज माध्यमांवर त्या मुजोर रिक्षाचालकाबद्दल नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे. स्थानकातील प्रवासी त्यास विरोध करत होते, मात्र वाहन सुरू असल्याने कोणी पुढे गेले नाही. या घटनेची रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने देखील गंभीर दखल घेतली असून त्या चालकाचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी व्हिडिओचा आधार घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने त्या घटनेत कोणाचाही अपघात झाला नाही.