मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोरखपूरला जाणारी रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा रेल्वेमध्ये चढण्याच्या घाईत चेंगराचेंगरी झाली, त्यात सुमारे 10 प्रवासी जखमी झाले अशी माहिती समोर आली आहे.
जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरवर्षी दिवाळी आणि छठ दरम्यान भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. सण साजरा करण्यासाठी देशातील विविध शहरांतील लोक यूपी-बिहारमध्ये जातात. दरम्यान, मोठी गर्दी झाल्याने हा अपघात झाला.
स्थानकात प्रचंड गर्दी असल्याने सर्वसाधारण बोगीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. आपत्तीनुसार 9 जण जखमी झाले असले तरी एकूण 10 जण जखमी झाल्याची पुष्टी रेल्वेने केली आहे. काहींचे पाय फ्रॅक्चर झाले आहे, तर काहींचे कंबर फ्रॅक्चर झाली आहे. दोन जखमींना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित भाभा रुग्णालयात दाखल आहे.