पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून समजले की, महिलेने मुलाला तिचे आईवडील राहत असलेल्या अल्टा व्हिस्टा इमारतीतील एका बंद घरात नेले होते. पोलिसांनी दोन दिवस या ठिकाणी शोध घेतला. ही महिला आपल्या मुलासह इमारतीत शिरताना दिसली. पण बाहेर पडल्याचे दिसत नव्हते. महिलेने आपल्या मुलासह इमारतीवरून उडी मारल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.