भरधाव वेगाने येणाऱ्या ऑटोरिक्षा उलटल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, डोंबीवलीतील घटना

रविवार, 9 फेब्रुवारी 2025 (14:26 IST)
डोंबिवलीमध्ये ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर 49 वर्षीय ऑटो रिक्षाचालक जखमी झाला. यश दिलीप वास्ते (19) असे मृताचे नाव आहे.यश हा एका हॉटेलमध्ये शेफ होता. डोंबीवली पश्चिम भागात आपल्या कुटुंबासह रहायचा.  चालकाची ओळख पटली असून किरण बिंगी त्याच इमारतीत वातव्यास आहे. 
ALSO READ: मुंबईतील वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोला आग लागली, कोणतीही जीवितहानी नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारी  रोजी रात्रि आरोपी चालक आणि यश हे दोघे जेवणानंतर घरातून बाहेर जाण्यासाठी निघाले. बिंगी याने आपला रिक्षा  घेतला यश मागच्या सीटवर बसला. ते डोंबीवली खाड़ीजवळून सुरई गावाकडे जात असताना एका पुलाच्या जवळ त्यांचा अपघात झाला.
ALSO READ: 6 महिन्यांपासून फरार असलेल्या बलात्काराच्या आरोपीला अकोला पोलिसांनी अटक केली
रिक्षा चालक बिंगी हा बेपर्वाइने रिक्षा चालवत होता आणि अनियंत्रित होऊन रिक्षा पालटली.या अपघातात वास्ते जखमी झाला.अपघाताला पाहता एका वाटसरुने घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक पोलिसांना अपघाताची माहिती दिली. वास्ते यांना  गंभीरअवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला केईएम रुग्णालयात रेफर केले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
ALSO READ: ठाण्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांचा डॉक्टरवर हल्ला, गुन्हा दाखल
नारपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले. वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की बिंगी नावाचा चालक रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न करता वेगाने गाडी चालवत होता, ज्यामुळे हा अपघात झाला. 
 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती