मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विविध भागात केलेल्या विशेष कारवाईत ११ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आणि २.४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यामध्ये १९८ ग्रॅम मेफेड्रोन ६.२३३ किलो गांजा, ३४६ ग्रॅम हेरॉइन आणि ३,४६० ड्रग्ज गोळ्यांचा समावेश होता.
ही संयुक्त कारवाई अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान, वांद्रे, कांदिवली, वरळी आणि घाटकोपर युनिट्सनी केली. अधिकाऱ्यांच्या पथकांनी मुंबईतील धारावी, वांद्रे, भायखळा, गोवंडी, गोरेगाव, मालवणी, बोरिवली आणि माहीम भागात छापे टाकले.