बान यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

वार्ता

सोमवार, 3 मे 2010 (12:36 IST)
संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी काल मुंबईत दहशतवाद्यांनी केलेला भ्याड हल्ला आपल्याला मान्य नसल्याचे सांगून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.

निरपराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार न्यायिक ठरत नाही. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना न्यायालयात उभे करून कठोर शिक्षा दिली पाहिजे. जखमींबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांच्या नातेवाईकांसाठी सांत्वना संदेश पाठविला आहे.

वेबदुनिया वर वाचा