मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी विरोध केला असून, दहशतवादाचे नेटवर्क मोडून काढण्यासाठी भारताला हवी ती मदत करण्यात अमेरिका तयार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुंबईत झालेल्या हल्ल्यात निर्दोष नागरिकांचा बळी गेला असून, आता दहशतवादाचा सफाया करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया ओबामांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांचे प्रवक्ते ब्रुक एंडरसन यांनी दिली आहे.