मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणी पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नसून, भारताने पाकविरोधात कोणताही निर्णय घेतला तरी भाजपचा सरकार आणि कॉग्रेसला पाठिंबाच असल्याचे आज भाजपने स्पष्ट केले आहे.
मुंबईत झालेला हल्ला हा भरतावर झालेला हल्ला असून, आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी पाकविरोधात कारवाई करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याचे संकेत दिले असतानाही कॉग्रेस सरकार मात्र स्वस्थ बसले असून, त्यांनी पाक विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास भाजप या प्रश्नी सरकारला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर सरकारने एनएसजी पथक पाठवण्यासाठी उशीराने निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.