आता आबांचा नंबर?

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:12 IST)
केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आज मुंबईत झालेल्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे.

भारतीय जनता पार्टीने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले असून, हे प्रकरण विलासरावांवरही शेकणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

मोठ्या शहरात छोट्या घटनात तर घडतच असतात असे वक्तव्य आबांनी केल्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा असून, भारतीय जनता पार्टीने आता आबांचे काय असा प्रश्नही केला आहे. आबांनीही या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे.

वेबदुनिया वर वाचा