मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय गुप्तहेर संस्थांचा ढिसाळपण स्पष्ट झाला असून, अमेरिकी गुप्तहेर संस्थांकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे मत केंद्रीय पोलाद मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेवरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर तेथील सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर संस्थांना आणखी प्रगत करण्यात आले असून, भारतीय गुप्तहेर संस्थांनी आता स्वत:चे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत पासवान यांनी व्यक्त केले आहे.