मुंबई जेव्हा वेठीला धरली गेली....

भाषा

सोमवार, 3 मे 2010 (12:31 IST)
मुंबई कधीही झोपत नाही. कधीही थांबत नाही. चोवीस तास मुंबई सुरूच असते. पण कालच्या घटनेने मात्र मुंबईला पार 'झोपवले'. थांबवले. आणि रोखून धरले.

दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईत गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येता- जाताना दिसत होत्या. लोक घाबरून इकडे तिकडे पळत होते. गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. लोक जेथे गोळीबार होत होता तेथून दूर जाऊ पहात होते. शिवाय ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्फोट झाले व गोळीबार होत होता, त्यापासून ते दूर जाऊ इच्छित होते.

गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात असलेल्या ताज हॉटेलमध्ये लष्कर आल्यानंतरही अतिरेक्यांनी पळून न जाता तिथेच थांबणे पसंत केले. रक्ताने माखलेले लोक बाहेर पडू इच्छित होते. त्यांना तातडीने एम्बुलन्सद्वारे हॉस्पिटलमध्ये नेले जात होते. हॉटेलचे कर्मचारी खूप घाबरलेले होते. ट्रिडेंट हॉटेलचे दृश्यही यापेक्षा वेगळे नव्हते. सगळीकडे काचांचे तुकडे पडले होते. छतातून आगीचे लोळ बाहेर येत होते.

वेबदुनिया वर वाचा