ताज व ओबेरॉयमध्‍ये मृत्युचे तांडव

भाषा

सोमवार, 3 मे 2010 (15:14 IST)
दहशतवाद्यांच्‍या निशाण्‍यावर असलेल्‍या ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात आले असताना या दोन्‍ही ठिकाणी मृत्युचे खुले तांडव पहायला मिळाले आहे. आतापर्यंत या दोन्‍ही हॉटेल्समधून सुमारे 80 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले आहेत. ताजच्‍या सहाव्‍या मजल्‍यावरून सुरक्षा दलाच्‍या जवानांनी आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढले आहेत.

मृतांमध्‍ये ताजचे 6 शेफ आणि सुमारे 10 कर्मचारी आहेत. दहशतवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यात ठार झालेल्या लोकांचे मृतदेह स्विमिंग पूल, हॉटेलची लॉबी आणि हॉलमध्‍ये विखरून पडलेले दिसले आहेत.

वेबदुनिया वर वाचा