ओबेरॉयमधील ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो' पूर्ण

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (15:10 IST)
सुमारे 40 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतवादी कारवाईला उखडून टाकण्‍यात भारतीय वीर जवानांना अखेर यश आले असून ओबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेले एनएसजीचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. तर नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांना मुक्‍त करण्‍यात जवानांना यश आले आहे. त्‍यामुळे आता तेथील दहशतवाद्यांना संपवून टाकण्‍यासाठी आखरी लढाई सुरू झाली आहे. दुस-या बाजूला ताज हॉटेलमधून काही-काही वेळाने गोळीबार सुरू आहे.

हॉटेल ओबेरॉय सैन्‍य दलाने ताब्‍यात घेतले असून कमांडोजने या कारवाईत 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तेथे 'ऑपरेशन क्लिनिंग' सुरू करण्‍यात आले आहे. या ठिकाणी स्‍फोटके पेरून ठेवण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत हॉटेलमधून 120 लोकांना सुरक्षित रित्‍या बाहेर काढण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा