८ मार्च 'महिला दिन' साजरा करीत असताना आजीही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मान मिळतो का? 'स्त्री-पुरुष समानता' आहे का? या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. स्त्री -पुरुष समानता हा नव्या शतकातील, नव्या संमाजनिर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्राचीन काळापासून स्त्रीला दुय्यम वागणूक मिळत आला आहे. आमच्या धर्मग्रंथांनी आग्रहाने बजावून ठेवले आहे. लहानपणी वडिलांनी, तरुणपणी नवर्याने आणि म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे. स्त्रिया या पापयोनीतील अर्थात जन्मताच पापी आहेत, हे गीतेच्या नवव्या अध्ययातील बत्तीसाव्या इलोकांमध्ये सांगितले आहे. भरतमुनीच्या नाट्यशास्त्र, गुरुचरित्र या ग्रंथामध्ये स्त्रीचे माणूस म्हणून अवहेलना केलेले आढळते. बंद पडलेली सतीप्रथा पुन्हा पुराणकाळात फोफावली, याला थोर संस्कृत लेख वाणभट्ट यांनी विरुद्ध केला. आपल्या इ.स. ६२५ च्या दरम्यान लिहिलेल्या कादंबरीत ते म्हणतात, प्रिय व्यक्तीच्या पाठोपाठ मरण (सती जाणे) स्वीकारणे निष्फळ होय. या निर्णयामुउे मृत्यू व्यक्तीला काहीच लाभ होत नाही. मृत व्यक्ती आपल्या कर्मानुसार नियोजित स्थळी जात असेल त्तर आत्महत्येच्या पातकामुळे सती जाणारी व्यक्ती नरकात जाते. ३0 वर्षांपूर्वी राजस्थानमधील 'रूपकँवर' सती जाताना तिला कोणी अडविले नाही. धर्मातच असे सांगितले आहे म्हणून समाज मूग गिळून गप्प बसला. सती जाण्याच्या या कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.