परफेक्ट वूमन

घरी असो वा बाहेर 
हिला नाही वेळ, 
करिअर अन् संसाराचा 
ही बसवेत मेळ... 
गरदार नीटनेटके
असते ही अपटुडेड
करते नेहमी धडपड 
जीवा लावते नेट... 
अभ्यास वा अॅक्टिव्हिटी
मुलांचा हवा प्रोग्रेस, 
त्यांच्या भविष्यासाठी
हिचा अवेअरनेस..
स्वावलंबी, आत्मनिर्भर
संसाराला हातभार लावते
अपार कष्टाच्या बळावर
यशाची शिखरे गाठते.. 
छंदासाठी वेळ
कला ही जोपासते
समाजकार्यात अग्रेसर 
सुपर वुमन म्हणवते.. 
कॉम्प्युटर विज्ञान तंत्रज्ञान
यातही हिची प्रगती
नेहमीच ही अपडेट 
ज्ञान शिक्षण माहिती..
आव्हान सारे झेलते
कर्तव्य अधिकार जाणते
परंपरा नवतेची सांगड
'परफेक्ट वुमन' म्हणवते. 
डॉ. सौ. मीना सोसे 

वेबदुनिया वर वाचा