आश्चर्य

ND
ती आदिवासी म्हातारी
प्राणांतिक भयाने धडपडत
डोंगराच्या कडेला गेली
आणि चिकटून उभी राहिली
पालीसारखी, खडकाला.
उघडीवाघडी
हजार सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली
हाडांची जीर्णाकृती.
मी क्षणभर ‍आदिवासी झालो
आणि तिच्याकडे पाहिलं,
अहो आश्चर्य -
तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून
लोंबत होतं आपलं पार्लमेंट
आणि ‍दुसर्‍या गाठोळीवरून
लोंबत होतं आपलं पार्लमेंट
आणि दुसर्‍या गाठोळीवरून होतं
आमचं साहित्यसंमेलन.

वेबदुनिया वर वाचा