कृती : पिठात 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, हळद घालून पीठ पाण्याने भिजवावे. चमच्याने तळणीत घालता येईल एवढे पातळ असावे. दही घुसळून ठेवा. पाणी न घालता मिरच्या, आलं, मीठ हे सर्व घुसळलेल्या दह्यात घाला. तेल तापत ठेवून पीठाचे चमच्याने भजी घालून तळा. खायला देण्याआधी पंधरा मिनिटे हे भजी दह्यात घालून ठेवावीत. देतेवेळी डिशमध्ये सात-आठ भजी दोन चमचे दही घालून खायला द्या.