तिखट आप्पे

ND
साहित्य : 2 वाटी तांदूळ, 1 वाटी चणाडाळ, पाव वाटी उदीड डाळ, अर्धी वाटी पोहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मिरे, अर्धा चमचा हळद,पाव चमचा हिंग, 10-12 हिरव्या मिरच्या, बोटभर आले, थोडी कोथिंबीर, मूठभर शेंगदाणे, थोडे ओल्या खोबऱ्याचे पातळ तुकडे, अर्धी वाटी तेल.

कृती : तांदूळ धुऊन वाळवून घ्यावे. नंतर तांदूळ, चणाडाळ, उदीड डाळ, पोहे, मिरी, जिरे हे सर्व करडेच भाजावे. शेंगदाणे भिजत घालून सोलून मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे. आप्पे करण्याअगोदर आदल्या दिवशी जरा कोमट पाण्यात पातळसर पीठ भिजवावे. दुसऱ्या दिवशी पिठात मिरच्या, आले वाटून घाला, हळद, हिंग, मीठ, कोथिंबीर घालून चाळवा, शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे घाला मग आप्पे पात्रातल्या वाट्यांमध्ये तेल लावून पळीने घालता येईल इतपत पीठ करून वाट्यांमध्ये घाला. झाकण ठेवा. पाच मिनिटांनी आप्पे उलटवा. थोडे तेल घाला. दोन मिनिटांनी काढा. खाण्याकरिता डाळ्याची चटणी पातळसर करावी व खायला द्या. तिखट असल्याने मुले आवडीने खातात.

वेबदुनिया वर वाचा