कृती : ओव्हन किंवा विस्तवावर वांग्याला चांगले भाजावे. भाजण्याआधी वांग्याला थोडं तेल चोपडावे म्हणजे साल सहजतेने निघेल. साल काढलेले वांगे चांगले हाताने मळावे व त्यात मीठ, दही मिसळावे. कढईत तेल गरम करून कांदे, लसूण व हिरवी मिरची भाजावी नंतर वांगे टाकावे. जेव्हा वांग्याचे भरीत तेलात सोडाल तेव्हा एक लिंबू पिळावा आणि कोथिंबीर घालून खाली उतरवावे. नान, पोळी सोबत गरम गरम वाढावे.