टोमॅटो जॅम रेसिपी बनवण्यासाठी टोमॅटो धुवून घ्या व क्रॉस मध्ये कापावे. पाणी चांगल्यापरकरे उकळू द्यावे मग गॅस बंद करून त्यामध्ये टोमॅटो घालावा. कमीत कमी 10 मिनिट तसेच राहू द्यावे. यामुळे टोमॅटोचे साल निघण्यास मदत होईल. पाण्यातून काढल्यानंतर टोमॅटोचे साल काढून घ्यावे. हे टोमॅटो बारीक कापावे. एका मोठ्या कढईमध्ये हे टोमॅटो घालावे व घट्ट होइसपर्यंत शिजवावे. मग मध्ये गूळ, दालचिनी पूड, लवंग घालावी. तसेच हे मिश्रण मिक्स करून घट्ट होइसपर्यंत परतवावे. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालावा. कमीत कमी दहा मिनिट थंड होण्यास ठेवावे व एका स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरावा. पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावे. तर चला तयार आहे आपली टोमॅटो जॅम रेसीपी.