साहित्य:
250 ग्राम सोया चाप, 3 चमचे दही, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून मिरची पावडर, 1/2 टीस्पून जिरेपूड, 1/2 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून तंदूरी मसाला पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/2 टीस्पून आले लसूण पेस्ट, 3 टेबलस्पून बटर,2 टीस्पून लिंबाचा रस, चाट मसाला 2 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ
कृती-
सोया चापचे लहान तुकडे करा.आता दह्यातील सर्व पाणी पिळून घ्या आणि सोया चापमध्ये दही मिसळा. नंतर त्यात बेसन, लाल तिखट, जिरेपूड, हळद, धनेपूड, तंदुरी मसाला पावडर, गरम मसाला, चाट मसाला, आले लसूण पेस्ट आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करा.सोया चॅप 20-30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.पॅनमध्ये बटर किंवा हलके तेल गरम करा. त्यात कांदा टाका आणि 5-7 मिनिटे शिजवा. तुकडे सतत वळवत राहा,भाजण्यापूर्वी,चापच्या तुकड्यांना थोडेसे लोणी लावा. दोन मिनिटे शिजवल्यानंतर तुमचा तंदूरी सोया चाप तयार आहे. त्यात चाट मसाला आणि लिंबू पिळून सर्व्ह करा.