रेसिपी :चमचमीत चविष्ट हिरव्या चटणीसह आलू चाट

गुरूवार, 4 मार्च 2021 (19:00 IST)
संध्याकाळी चहासह काही चमचमीत खायला लागते. दररोज काय बनवायचे हा विचार करून अक्षरशः वैताग येतो. या साठी चमचमीत हिरव्या चटणीसह आलू चाट बनवा. खायला नक्की आवडेल. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
हिरव्या चटणीसाठी साहित्य -
एक कप कोथिंबीर, हिरव्यामिरच्या,अर्धा चमचा काळेमीठ, लिंबाचा रस. 
चटणी बनविण्याची कृती -
एका मिक्सरच्या पात्रात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि काळेमीठ घाला सर्व साहित्य लागत लागत पाणी घालून वाटून घ्या वरून लिंबू पिळून घ्या. चटणी तयार.
 
चाट बनविण्यासाठी साहित्य- 
दोन ते तीन उकडलेले बटाटे, चिमूटभर काळेमीठ,काळीमिरीपूड, जिरेपूड, चाट मसाला, तिखट,कांदा, चिंचेची चटणी, तेल.
 
कृती - 
 
उकडलेले बटाटे गरम तेलात सोनेरी तळून घ्या.एका प्लेट मध्ये काढून घ्या. या मध्ये काळेमीठ, काळीमिरपूड, जिरेपूड, चाट मसाला 
तिखट,घाला. वरून चिरलेला कांदा आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. या मध्ये हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घाला. आणि चांगले मिसळा. आलू चाट खाण्यासाठी तयार.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती