सर्वात आधी चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी. मग सकाळी पाणी काढून सुती कापडावर पसरवून वाळवावी. आता कढईत तेल गरम करावे. आता डाळ तेलात टाकून कुरकुरीत होइसपर्यंत टाळून घ्या. डाळ चांगली तळल्यावर ती बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवावी म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. आता तळलेली डाळ एका मोठ्या भांड्यात ठेवा आणि त्यात हळद, तिखट, चाट मसाला, काळे मीठ, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावे. मसाले चांगले मिक्स करावे जेणेकरून ते डाळीला चांगले चिकटतील. मसालेदार चणाडाळ पूर्णपणे थंड होऊ द्या. व हवाबंद डब्यात ठेवावी. हे नमकीन बरेच दिवस ताजे राहते आणि तुम्ही ते कधीही खाऊ शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.